पालोदकर महाविद्यालयात गणित दिवस उत्साहात

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) : पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात २२ डिसेंबर रोजी महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.

श्रीनिवास रामानुजन यांनी गणितामध्ये, विशेषतः अनंत मालिका आणि संख्या सिद्धांतामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यांच्या अतुलनीय प्रतिभेला आणि गणित क्षेत्रातील
योगदानाला सन्मान देण्यासाठी महाविद्यालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी असा होता. महाविद्यालयाचे गणित शिक्षक सुनील तांबे, प्रफुल्ल कळम, राजेश ठोंबरे यांनी रामानुजन करून कार्यक्रमाची सुरुवात यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी ढोरमारे हिने केले तर प्रांजल ढोरमारे, त्रिष्णा भामरे या विद्यार्थिनींनी श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितीय कार्याविषयी सांगितले की, श्रीनिवास रामानुजन यांनी गणिती विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका, आणि सतत अपूर्णांक यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यात त्यांनी हजारो सूत्रे आणि प्रमेय शोधून काढली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे म्हणाले की रामानुजन यांचे कार्य संख्या विभाजन, मॉड्यूलर फॉर्म्स, आणि हाइपर जिओमेट्रिक सिरीज मध्ये विशेष उल्लेखनीय आहे, त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे कार्य गणितज्ञांना प्रेरणा देत आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक दिलीप जाधव, प्रदीप कानडजे, कृष्णा भांडारे, योगेश निंभोरे, भास्कर केरले, सुनील सागरे, राजाभाऊ भोसले, गजानन सपकाळ, विक्की चांदुरकर, डॉ रमेश काळे, संजय जाधव, जयश्री चापे, महादेवी ठवरे, संतुकराव मोरे, अक्षय निकम उपस्थित होते.